आदिवासी हक्कांसाठी लढा सुरूच राहील!*
*आज मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री अशोकजी उइके साहेब यांना तहसीलदार साहेब हदगाव यांच्या मार्फत आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.*
आरक्षण, शिक्षण, रोजगार, शिष्यवृत्ती, जमिनीचे हक्क, बोगस आदिवासी प्रकरणे तसेच रिक्त पदभरती यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर तात्काळ कार्यवाही करण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
*यावेळी अंकुश मिरासे (तालुका युवा अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली), प्रा. देवा मिरासे (जिल्हा उपाध्यक्ष, नांदेड), श्रीरंग देशमुखे (सरपंच), नारायण गव्हांडे (चेअरमन), अशोक राठोड,विशाल भिसे, राजेश डुकरे, चंद्रकांत वानोळे, चांदु चाकोते, गोविंद धनवे, विश्वांभर वागतकर आदी उपस्थित होते.*
जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
*✊