logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ॲग्रीस्टॅक अंतर्गत डिजीटल क्रॉप सर्वे व भूमी अभिलेख कामांचा सविस्तर आढावा संपन्न

ॲग्रीस्टॅक अंतर्गत डिजीटल क्रॉप सर्वे व भूमी अभिलेख कामांचा सविस्तर आढावा संपन्न
पाचोरा प्रतिनिधी:-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
दिनांक: २० मार्च, २०२६
जळगाव जिल्ह्यातील शेती आणि महसूल दस्तऐवजांच्या डिजिटलायझेशनला गती देण्यासाठी आज माननीय जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दुरचित्रवाणी परिषदेद्वारे महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील ॲग्रीस्टॅक व डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) संदर्भातील प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे:

डिजीटल क्रॉप सर्वे (DCS): रब्बी हंगाम २०२५-२६ साठी जिल्ह्यातील नोंदणीचे उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष प्रगतीचा तुलनात्मक आढावा घेण्यात आला. तसेच तांत्रिक समस्यांचे निराकरण करून नोंदणी प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.

शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID): वनहक्क पट्टेधारकांना शेतकरी ओळख क्रमांक देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर चर्चा करून त्या सोडविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

मोजणी प्रकरणे: प्रलंबित मोजणी अर्ज, भूसंपादन मोजणी आणि पोट-हिस्सा मोजणीच्या पथदर्शी प्रकल्पाचा तालुका निहाय आढावा घेण्यात आला.

प्रशासकीय सुधारणा: ग्रामीण रस्ते सीमांकन व मोजणीच्या कामांसाठी खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती आणि क. जा. प. (कमी जास्त पत्रक) कार्यवाही पूर्ण करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त झाल्या.

प्रशासनाचा संकल्प: पारदर्शक महसूल प्रशासन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी बांधवांना जलद सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.

4
47 views

Comment