logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बाळासाहेब खंडू वाळुंज पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड; वाळुंजनगरमध्ये जल्लोषात सत्कार

लोणी प्रतिनिधी:- तेजस वाळुंज

वाळुंजनगर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळासाहेब खंडू वाळुंज पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा वाळुंजनगर ग्रामपंचायत येथे पार पडला.
या प्रसंगी सरपंच तृप्तीताई महिंद्रशेठ वाळुंज पाटील, ग्रामसेवक नानेकर मॅडम, माजी सरपंच नवनाथ वाळुंज पाटील, माजी सरपंच जालिंदर वाळुंज, माजी सरपंच नंदा वाळुंज, ग्रामपंचायत सदस्या कविता वाळुंज, शाळा समिती अध्यक्ष (पारगाव) संजय तटटू, सेल्स टॅक्स अधिकारी (पुणे) बाबाराजे वाळुंज, संतोष वाळुंज, युवा नेते मनोहर वाळुंज, गोरक्षनाथ वाळुंज, हनुमंत गोपाळे, माजी सरपंच महिंद्रशेठ वाळुंज, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गुलाब वाळुंज, शंकर शिनलकर, शामराव शिनलकर, संदीप वाळुंज, गणेश साकोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महिला भगिनी, प्रतिष्ठित मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच बाळासाहेब खंडू वाळुंज पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच पुढील काळात गावाच्या विकासासाठी रस्ते, पाणी नियोजन, वीज (लाईट) तसेच इतर मूलभूत सुविधांवर भर देऊन काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

6
3295 views

Comment