logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

परळीत गुढी पाडव्याच्या दिवशी शंभू महादेवाच्या वाघाच्या काठीचा व कावडीचा मिरवणूक उत्सव थाटात संपन्न

परळीत गुढी पाडव्याच्या दिवशी शंभू महादेवाच्या वाघाच्या काठीचा व कावडीचा मिरवणूक उत्सव थाटात संपन्न

परळी वैजनाथ प्रतिनिधी

पंचम ज्योर्तिलिंग स्वयंभू प्रभु वैद्यनाथाच्या परळी नगरी मध्ये शंभू महादेवाच्या वाघाच्या काठीची व कावडीची प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी गुढी पाडव्याच्या शुभ दिनी सायंकाळी भव्य दिव्य मिरवणूक जंगम गल्लीतील मठपती दयानंद त्रिंबक स्वामी यांच्या घरून काढण्यात आली .
19 मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता वाघाच्या काठीचा व कावडीचा विधीवत स्थापना सोहळा पार पडला . त्यानंतर दिवसभर भक्तगण दर्शनासाठी व नैवेद्य दाखवण्यासाठी जंगम गल्लीतील मठपतीच्या घरी येत होते .
सांयकाळी 5 वाजता स्वामी (मठपती) परिवार व निवनिर्वाचित नगरसेवक सौ जयश्रीताई मोगरकर, श्री योगश भैय्या मेनकुदळे व श्री नितीन भैय्या बागवाले यांच्या हस्ते शंभु महादेवाच्या काठीची व कावडीची पूजा करून महाआरती करण्यात आली. साखरेच्या गाठीची माळ , पुष्पहार घालून व एकदा शंभूच्या नावाने हर बोला हर हर महादेव चा जयघोष करीत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. जंगम गल्लीतील प्रांगणात जवळपास एक ते दीड तास भक्तगण व विशेष करून तरूण वर्ग ही 21 फुट उंचीची वजनदार असलेली काठी तळहातावर घेऊन वाद्यांच्या तालावर लिलया नाचत होते. तदनंतर जंगमगल्ली , देशमुख गल्ली, गणेशपार , नांदुरवेस, इटके गल्ली, अंबेवेस या पारंपारिक पालखी मार्गाने जात असता प्रत्येक घरातून शंभु महादेवाच्या काठी व कावड चे स्वागत पुजा करून साखरेच्या गाठीची माळ घालून पुजा करण्यात येते होती.
शंभु महादेवाच्या काठी व कावड ची मिरवणूक रात्री देशमुख पार येथील माजी आमदार कै.लक्ष्मणराव देशमुख यांच्या गडी (वाड्यावर) नेण्यात आली. तेथे देशमुख परिवारा तर्फे महादेवाच्या काठी चे स्वागत करण्यात आले व विधिवत पूजा करून तेथेच काठी व कावडची स्थापना करण्यात आली. मठपती परिवार व देशमुख परिवार या दोन्ही घरांशी निगडीत 150 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेला उत्सव मठपती परिवाराच्या वतीने थाटात सुरू होतो व देशमुख परिवाराच्या आगतस्वागताने या दिवसभराच्या सोहळ्याची सांगता होते.
एकदा शंभूच्या नावाने हर बोला हर हर महादेव या जयघोषात 21 फुट उंच असलेली वजनदार काठी तळहातावर घेऊन वाद्यांच्या तालावर नाचवणे ही शिवभक्तांसाठी मोठ्या कौशल्याची, भक्तीची व शक्तीची परिक्षा असते व हा अद्वितीय क्षण पाहणाऱ्यास अलौकिक आनंद देतो असे उपस्थित शिवभक्त सांगता सोहळ्यानंतर एकमेकांना बोलताना दिसून येत होते .
देशमुखाकडे विराजमान असलेली काठी व कावड एकादशी च्या सध्याकाळी प्रभु वैद्यनाथाच्या मंदीरात जाऊन तेथून मठपतीच्या घरी चैत्र आमावस्ये पर्यंत उभी असते. द्वादशीपासून भक्तगण सोयीनुसार खीर आंबील घुगऱ्या नैवेद्य करून आणून दाखतात व याच काळात एकदा शिखर शिंगणापूर ला शिखराला लावण्यासाठी वाघाची काठी व कावड नेली जाते. अमावस्येला खीर आंबिल चा नैवेद्य प्रसाद करून या संपूर्ण एक महिन्याच्या सोहळ्याची सांगता होते व वाघ स्वरूपातील शंभु महादेव मठपतीच्या देव्हाऱ्यात स्थानापन्न होतात.
यावर्षीच्या गुढीपाडव्याच्या दिमाखदार सोहळ्यात शंभु महादेवाच्या वस्त्रासारखा जवळपास सर्व शिवभक्तांचा एक सारखा गणवेश व महिलांच्या ही एक सारख्या साड्या हे एक विशेष आकर्षण होते .
या मिरवणूक सोहळ्यात जंगम समाज , वीरशैव लिंगायत समाज तसेच इतर अनेक शिवभक्त मित्रगण , तरुण वर्ग या शिवभक्तांसह देशमुख पार येथील देशमुख परिवारातील अनेक सदस्यांसह स्वामी मठपती परिवारातील सर्व सदस्यांचा व भक्तगणांचा मोठा सहभाग होता .

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
78 views

Comment