logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : चिंचपूर पांगुळ येथील दरोडा प्रकरणातील ‘बदाम गँग’ 48 तासांत जेरबंद...


अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखेने चिंचपूर पांगुळ, ता. पाथर्डी येथे घडलेल्या दरोडा प्रकरणाचा अवघ्या 48 तासांत छडा लावून ‘बदाम गँग’मधील 6 आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल 10,71,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 10 दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक 18 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दगडू भिमराज बडे (वय 47, रा. मळईवस्ती, चिंचपूर पांगुळ) यांच्या घरी 6 अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. फिर्यादी व त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,62,000/- रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला होता. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री. किरणकुमार कबाडी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मजले चिंचोली येथील शिवारात सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली.
अटक आरोपींमध्ये बदाम कडू काळे (वय 22), साईनाथ विष्णू चव्हाण (वय 22), ऋतिक हसमुख चव्हाण (वय 20), महेश उर्फ उमेश नंदू काळे (वय 20), भैय्या कडू काळे (वय 20) व लाकर करमत काळे (वय 26) यांचा समावेश आहे. तर तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपींकडून 69 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत 10,25,000/-), 6 मोबाईल (46,000/-) तसेच शस्त्रे असा एकूण 10,71,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासात या टोळीने शेवगाव, नेवासा, राहुरी आदी ठिकाणी 10 गंभीर गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. तसेच आरोपींना आश्रय देणाऱ्या संजय आव्हाड यालाही गुन्ह्यात सहभागी करण्यात आले आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी पाथर्डी पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
#Ahilyanagar
#Pathardi
#ChinchpurPangul
#CrimeNews
#PoliceAction
#LocalCrimeBranch
#BadamGang
#RobberyCase
#HouseRobbery
#BreakingNews
#MaharashtraPolice
#CrimeUpdate
#PoliceInvestigation
#GangArrested
#LootCase
#GoldRecovery
#OperationSuccess
#LawAndOrder
#Justice
#AhmednagarNews

28
3970 views

Comment