logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तहसीलदार साहेब तहसील कार्यालय लोणार, विषय : अवकाळी पाऊस आणि गारपीटने झालेल्या नुकसानी बाबत.

निवेदन

दि. 20/3/2025

प्रती,

तहसीलदार साहेब तहसील कार्यालय लोणार,

विषय : अवकाळी पाऊस आणि गारपीटने झालेल्या नुकसानी बाबत.

महोदय,

वरील विषयास अनुसरून निवेदन करण्यात येते कि, अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळी पाऊसामुळे कांदा, ज्वारी, गहू व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे चिंचोली सांगळे, परदा दराडे, येवती, वाझर आघाव या गावचे आर्थिक नुकसान खूप झाले आहे आणि उपजीविकेवर परिणाम झाला आहे. शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असून निसर्गाची अवकृपा झाल्या मुळे शेतकरी मेटापोटीस आला आहे.

तरी आपणास विनंती आहे की, संबंधित विभागाकडून पंचनामा करून सर्व शेतकऱ्याचे नुकसानीची नोंद घ्यावी व शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई लवकरात लवकर मंजूर

करावी.

0
436 views

Comment