logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज: माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान

कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज: माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान
पाचोरा प्रतिनिधी:-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
दिनांक: १९ मार्च, २०२६
जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांनी आज "जैन हिल्स"येथे भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन आणि "फ्युचर फार्मिंग"च्या विविध प्रयोगांची सविस्तर पाहणी केली.

भेटीचे मुख्य पैलू व वैशिष्ट्ये:

टिश्यूकल्चर व रोपवाटिका: भात, हळद, आले, आंबा व संत्रा यांसारख्या पिकांची व्हायरस फ्री व दर्जेदार रोपे तयार करण्याच्या प्रक्रियेची त्यांनी माहिती घेतली.

क्लायमेट स्मार्ट तंत्रज्ञान: हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी ग्रीनहाऊस, पॉलिहाऊस व शेडनेटमधील नियंत्रित शेती आणि 'सिक्स इन वन' तंत्रज्ञानाचे त्यांनी कौतुक केले.

आधुनिक शेतीचे प्रयोग: हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग आणि क्लायमेट न्यूट्रल बटाटा बियाणे निर्मितीची प्रात्यक्षिके पाहून मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले.

उत्पादकता वाढीवर भर: कापूस, कडधान्ये व तेलबियांची पिके ठिबक सिंचनाद्वारे घेतल्यास उत्पादनात होणारी वाढ भारताला कृषी क्षेत्रात 'आत्मनिर्भर' करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशासकीय दृष्टिकोन:
विज्ञानावर आधारित शेती आणि आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाची कास धरल्यास देश प्रगतीच्या दिशेने झेप घेईल, असे प्रतिपादन मा. मंत्री महोदयांनी यावेळी केले. कृषी विभागाच्या माध्यमातून अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

0
0 views

Comment