50 हजारांची लाच घेताना महिला कार्यकारी अभियंता अटकेत!
नाशिक जिल्हा परिषदेतील लघू पाटबंधारे विभागाच्या महिला कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि लेखाधिकारी अरुण धारणकर यांना ५० हजारांची लाच घेताना 'एसीबी'ने रंगेहात पकडले. बंधारा दुरुस्तीचे १६ लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती.