तालुका पत्रकार संघटनेतर्फे अहेरीत "नारी शक्ती सन्मान सोहळा"
विविध क्षेत्रातील 12 महिलांचा केला सत्कार
तालुका पत्रकार संघटनेतर्फे अहेरीत "नारी शक्ती सन्मान सोहळा"
@विविध क्षेत्रातील 12 महिलांचा केला सत्कार
(अहेरी)
लोकशाहीत महत्त्वाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणारी तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वातील तालुका पत्रकार संघटनेने शासकीय, निमशासकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजसेवा करणाऱ्या बारा महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष आलापलीच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले तथा उद्घाटक म्हणून 37 बटालियनचे कमांडंट दव इंजिरकम किंडो यांच्या हस्ते आज करण्यात आला.
स्थानिक संत मानव दयाल अनुदानित आश्रम शाळेतील सत्कार सोहळ्यात बारा महिलांना शाल,सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
महिला दिनाच्या औचित्ताने सत्कारमूर्ती म्हणून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार मनोरमा जाँगी, नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रोजा करपेत, आलापल्ली वनविभागाच्या वनकर्मचारी सविता संजय अलोने, समाजभूषण पुरस्कार प्राप्त तथा नेपाळ येथील मानवता सन्मानाच्या मानकरी सेवानिवृत्त पर्यवेक्षिका सुशीला भगत, देवलमरीच्या ग्रामविकास अधिकारी एम ए धुर्वे, पेरमिलीच्या अंगणवाडी सेविका लतिका दहागावकर, रेपणपली वनपरिक्षेत्राच्या वनरक्षक रेखा नरोटे, व्यवसाय करून सामाजिक कार्यातून महिलांना एकत्रीकरण करण्याच्या पुरस्कर्त्या किरण भांदककार, कोळसेपल्ली आरोग्य पथकाच्या आरोग्य सेविका विजया रामटेके,पेरमिली पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल मुस्कान शेख, कमलापूरच्या अशा गट प्रवर्तक विद्यादेवी यजुलवार यांना गौरविण्यात आले.
मंचावर बटालियनचे उपकमांडंट चंद्रमोरे अनिल, मेजर तायडे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भरतकर उपस्थित होते.
कमांडंट दव किंडो, डीएफओ दिपाली तलमले यांनी मार्गदर्शन तर सत्कारमूर्ती सुशीला भगत, किरण भांदककार, रेखा नरोटे यांनी मनोगतातून संघटनेचे आभार मानले.
यशस्वीतेसाठी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष आसिफ खान पठाण, सचिव रमेश बामनकर डॉ. शंकर दुर्गे श्रीधर दुग्गीरालापाटी, सदाशिव माकडे, बबलू सडमेक दीपक चुनारकर श्रीकांत दुर्गे व इतर पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.
यावेळी शाळेच्या विदयार्थ्यानी महिला दिनाची माहिती ऐकून घेतली.
कार्यक्रमाचे संचालन रमेश बामनकर, प्रास्ताविक ऋषी सुखदेवे तर आभार बबलू सडमेक यांनी मांडले.