logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जळगांव येथे “केळी उत्पादक शेतकरी संवाद" मेळावा...!

जळगांव येथे “केळी उत्पादक शेतकरी संवाद" मेळावा...!
पाचोरा प्रतिनिधी:-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय कृषी मंत्री मा.ना.श्री.शिवराज सिंह चौहान जी यांच्या प्रमुख उपस्थित “केळी उत्पादक शेतकरी संवाद” या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आज दि.१९मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते.

यावेळी केळी शेतीतील नव्या तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन वाढीसाठी उपयुक्त पद्धती,हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी,बाजारातील अस्थिरता तसेच शाश्वत व वैज्ञानिक उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत विविध आधुनिक उपायांची माहिती दिली.

आपल्या भाषणात केंद्रीय कृषी मंत्री मा.ना.श्री.शिवराज सिंह चौहान जी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे केंद्र सरकारचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले.यासाठी विविध योजना राबवून आधुनिक तंत्रज्ञान शेतीत आणण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.श्री.गिरीशभाऊ महाजन,केंद्रीय राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा.श्रीमती रक्षाताई खडसे,जळगावच्या खासदार मा.श्रीमती स्मिताताई वाघ,आमदार अमोल जावळे,केंद्रीय कृषी मंत्रालयातील सहसचिव श्री.प्रिय रंजन,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय महेश्वरी,जिल्हाधिकारी श्री.रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्री.महेश्वर रेड्डी,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल तसेच विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

3
177 views

Comment