logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

श्रावणी महिला मंडळ मनीष नगर नागपूर तर्फे महिला सर्प मित्र प्राणी मित्र चैताली भस्मे यांचा सत्कार

*श्रावणी महिला मंडळ मनिष नगर ,नागपूर तर्फे महिला सर्पमित्र प्राणीमित्र " चैताली भस्मे यांचा सत्कार* मनीष नगर येथील श्रावणी महिला मंडळ दर वर्षी. विशेष कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून त्यांच्या समाज हितासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देते यावर्षी त्यांनी सत्कारमूर्ती म्हणून सापासारख्या विषारी वन्यजीवांपासून लोकांचे रक्षण करणाऱ्या आणि लोकांपासून विषारी सापाला वाचउन जीवनदान देणाऱ्या तसेच मांगल्य फाऊंडेशन संस्थेद्वारे गोर ,गरीब ,अपंग ,निराधार वृद्ध महिला,मुलांसाठी 2005 पासून ते आजपर्यंत अखंड निस्वार्थ. सेवा करणाऱ्या पर्यावरणासाठी निसर्गासाठी समाजसेवे साठी आपले जीवन अर्पण केलेल्या, रणरागिणी चैताली भस्मे यांची निवड केली , शहरातील माजी महापौर नंदाताई जिचकार यांच्या हस्ते चैताली भस्मे यांना शाल, श्रीफळ, तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी कांबळी ,,निखिल गौरकर, नगरसेवक विशाखा ताई मोहोड, रमेशभाऊ भंडारी , पूजाताई. भुगावकर इत्यादी सन्माननीय व्यक्ती उपस्थित होते पूर्ण मनीष नगर मध्ये एकच महिला सर्पमित्र असून रात्री बेरात्री लोकांच्या मदतीला धावून जाउन पुरुषांच्या. बरोबरीचे काम.करते या गोष्टीचा सर्वांनी एक महिला म्हणून. खूप खूप अभिमान व्यक्त केला

53
2033 views

Comment