जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
बुलढाणा - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन लोणार तालुक्यातील किनगाव जटु परिसरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. ।येथील प्रतिष्ठीत नागरिक शिरुभाऊ बिन्नीवाले यांच्या घराजवळील परिसरात खजूर, लिंबू, सिताफळ व आदी झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेणे आवश्यक असुन वृक्षांचे संगोपन करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुढे येण्याची गरज आहे. । वृक्षारोपणा बरोबरच वृक्षसंगोपन करणे आवश्यक आहे असे मत सचिन नागरे यांनी मांडले. याप्रसंगी इंजि. अभिषेक बिन्नीवाले, स्वप्निल बिन्नीवाले, सचिन नागरे, विशाल खोलगडे, पवन सातपुते व आदी सहकारी उपस्थित होते.