शहर पोलीसांची दमदार कामगिरी;मेफेंटरर्मिनच्या ५५ बाटल्या पकडल्या...
शहर पोलीसांची दमदार कामगिरी;मेफेंटरर्मिनच्या ५५ बाटल्या पकडल्या...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) दिनांक 17/03/2026 रोजी दुपारी शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वार्ड नं. 07 थत्ते ग्रांउड परीसरात दोन इसम नशेसाठी वापरली जाणारी गुंगीकारक मेफेंटरर्मिन औषधाच्या बॉटलची विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगुन आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकास थत्ते ग्रांउड परीसरामध्ये सापळा लावण्यास सांगुन दोन्ही इसमाचा शोध घेवुन सदरचे दोन्ही इसम मिळुन येताच खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने बातमीची खात्री करुन तात्काळ थत्ते ग्रांउड वॉर्ड नं.07, श्रीरामपूर परिसरामध्ये सापळा लावला असता हे दोन्ही इसम मिळुन आल्याने त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अथर्व पाटील, वय-22 वर्षे, रा. पटेल हायस्कुलमागे, अॅमेझॉन ऑफीसमोर, वार्ड नं 07, श्रीरामपूर 2) गिरीश मुंदडा, वय-21 वर्षे, रा. साई सहवास अपार्टमेंट, वार्ड नं. 7,श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले.
ह्या इसमाच्या ताब्यातुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.
1)1569/- रु. कि.च्या MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP, TERMIVA च्या एकुण 5 बॉटल 30mg/ml च्या प्रत्येकी किंमत 313.87/- रुपये छापील किंमत असलेली त्याचा बॅच नं P5580 असा असलेला.
2) 18,950/-रु.कि.च्या MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP, Termin च्या एकुण 50 बॉटल 30mg/-ml च्या प्रत्येकी किंमत 379/- रुपये छापील किंमत असलेली त्याचा बॅच नं V307247 असा असलेला 20,519/- रु.एकुण किंमतीचा मुद्देमाल वरील दोन्ही आरोपींकडून मिळून आला.
वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल वर नमुद आरोपीकडुन जप्त करण्यात आला असुन त्यांच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 197/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123,125,278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना नमुद गुन्हयात तात्काळ अटक करण्यात आली आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015