logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिर्डीवरुन परतत असलेल्या भक्ताला श्रीरामपुरात चाकू लावून लुटणारे धरले...

शिर्डीवरुन परतत असलेल्या भक्ताला श्रीरामपुरात चाकू लावून लुटणारे धरले...


श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- शिर्डी येथून दर्शन घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या एका नोकरदाराला श्रीरामपूर - नेवासा रोडवर चाकूचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या मोटारसायकलसह एकूण १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की,फिर्यादी विलास चंद्रभान वलेकर (वय ४८, रा. माजलगाव, जि. बीड) हे १६ मार्च २०२६ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास आपल्या पल्सर मोटारसायकलवरून शिर्डीहून आपल्या गावी जात होते. श्रीरामपूर-नेवासा रोडवरील पोस्ट ऑफिससमोर ०३ अनोळखी इसमांनी मोटारसायकलवरून येत त्यांची गाडी अडवली. त्यातील एकाने वलेकर यांच्या गळ्याला चाकू लावला, तर दुसऱ्याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले व मारहाण केली. आरोपींनी त्यांच्याकडील पल्सर मोटारसायकल, मोबाईल आणि २,३०० रुपये रोख असा एकूण ९२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला.
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (गुरनं. १९४/२०२६ बी.एन.एस. कलम ३०९(४), ३११, ३(५)) दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकाला तातडीने शोध घेण्याचे आदेश दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे हा गुन्हा सराईत आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी सापळा रचून सौरभ शिंदे (वय २७, रा. हुसेननगर, श्रीरामपूर) आणि जुबेर शेख (वय २२, रा. नवीन पोस्ट कॉलनी जवळ, गोंधवणी) या दोघांना हुसेननगर पाटाजवळून ताब्यात घेतले. तिसरा आरोपी अरबाज पठाण हा अजून सापडलेला नाही आहे.
पोलिसांनी आरोपींकडून मोटारसायकल, मोबाईल, २ हजार रुपये रोख आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक रोशन निकम आणि त्यांच्या तपास पथकातील अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिद्र कातखडे, अजित पटारे, सागर बनसोडे, सचिन दुकळे, रामेश्वर तारडे व अमोल गायकवाड यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम करत आहेत.


Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment