logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पालिकेचा ठेका 56 लाखांना;अट नसल्याने पाळण्यांचे दर वाढणार ?

पालिकेचा ठेका 56 लाखांना;अट नसल्याने पाळण्यांचे दर वाढणार ?

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) -

श्रीरामपूर नगरपालिकेने श्रीरामनवमी यात्रेसाठी पाळण्यांचा ठेका ५६ लाख रुपयांना दिला असून यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मात्र यंदाच्या टेंडरमध्ये पाळण्यांचे दर निश्चित करण्याबाबत कोणतीही अट नसल्याने हे दर ठरवण्याचा अधिकार ठेकेदाराला मिळाला आहे. त्यामुळे यात्रेकरूंना पाळण्यांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार असे दिसते आहे.
श्रीराम नवमीनिमित्ताने थत्ते मैदानावर लागणाऱ्या रहाट पाळण्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेकडून ऑनलाईन टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. या टेंडरमध्ये ५ ते ६ जणांनी सहभाग घेतला होता. अखेर चौधरी नावाच्या व्यक्तीने ५६ लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावत ठेका मिळविला. 'गेल्या वर्षी हा ठेका सुमारे ३६ ते ३८ लाख रुपयांच्या दरम्यान देण्यात आला होता.
ठेका रकमेतील वाढ ही पालिकेसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असली तरी नागरिकांना पाळण्यांचे दर नक्कीच परवडणारे नसणार असे दिसते.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment