*हिंगणा सहकारी कार्यालयात शिस्तीचा बोजवारा? वेळेवर न उघडणारे कार्यालय, भ्रष्टाचाराला खतपाणी*!
*हिंगणा सहकारी कार्यालयात शिस्तीचा बोजवारा? वेळेवर न उघडणारे कार्यालय, भ्रष्टाचाराला खतपाणी*!
(गजानन ढाकुलकर) हिंगणा :
हिंगणा येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका कार्यालयात प्रशासनाची शिस्तच हरवली की काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार कार्यालय सकाळी १० वाजता सुरू होणे बंधनकारक असताना अनेक वेळा कार्यालय उशिरा उघडले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद व सामान्य नागरिक विविध कामांसाठी कार्यालयात येतात; मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसल्यामुळे लोकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. परिणामी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, कामकाजात जाणूनबुजून विलंब करून काही ठिकाणी गैरप्रकार व भ्रष्टाचाराला वाव दिला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जर ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर सहकार क्षेत्रातील कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर श्री अजय कडू यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांची मीटिंग सुरू असतानाही त्यांनी तत्काळ मोबाईल उचलून माहिती ऐकून घेतली, यावरून त्यांच्या कामातील तत्परता दिसून आली.
आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015