UPSC परीक्षेत यश संपादन – जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला
UPSC परीक्षेत यश संपादन – जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला
पाचोरा प्रतिनिधी:-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील रहिवासी श्री. आकाश ओम त्रिवेदी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी, जळगाव यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
ही कामगिरी जिल्ह्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरून स्पर्धा परीक्षांसाठी सकारात्मक दिशा देणारी आहे.
जिल्हा प्रशासन, जळगाव कडून श्री. आकाश ओम त्रिवेदी यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.