logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दीपक कायंदे यांना 'भारत रत्न नॅशनल सर्व्हिस अवॉर्ड' प्रदान लोणार (प्रतिनिधी): समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव

दीपक कायंदे यांना 'भारत रत्न नॅशनल सर्व्हिस अवॉर्ड' प्रदान
लोणार (प्रतिनिधी):
समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित 'भारत रत्न नॅशनल सर्व्हिस अवॉर्ड २०२६' यंदा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील येवती येथील श्री. दीपक शिवाजी कायंदे यांना प्रदान करण्यात आला आहे.
जीवन जागृती सेवा संस्था आणि भारत रत्न सन्मान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. दीपक कायंदे हे नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया (NACOCI) चे जिल्हा मुख्य युवा अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन आणि युवा सशक्तीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळातही समाजातील अनिष्ट रूढी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले

0
19 views

Comment