logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ठाण्यात श्री स्वामी समर्थ जयंती व पालखी सोहळा उत्साहात साजरा होणार...

📰 ठाण्यात श्री स्वामी समर्थ जयंती
( प्रथम वर्धापनदिन) व पालखी सोहळा उत्साहात साजरा होणार...
श्री स्वामी समर्थ भक्तपरिवार संस्था शिवाजीनगर, वागळे इस्टेट,ठाणे यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ जयंती (प्रकटदिन) व पालखी सोहळा तसेच स्वामींच्या या मठाचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा धार्मिक सोहळा १५ मार्च ते २० मार्च २०२६ या कालावधीत विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत रविवारी (१५ मार्च) भव्य रक्तदान शिबिराचे पार पडले आहे.
गुरुवारी (१९ मार्च) गुढीची स्थापना करून नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे...
स्वामींची उपासना सकाळी ७ ते ११ या वेळेत होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ ते ७ या वेळेत पालखी मिरवणूक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
शुक्रवारी (२० मार्च) मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ७ ते १० या वेळेत श्री स्वामी चरित्र सारामृत पठण होईल. दुपारी १२ वाजता महाआरती पार पडेल. त्यानंतर दुपारी ४ ते ६ या वेळेत संगीतमय भजन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ ते १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा संपूर्ण सोहळा श्री स्वामी समर्थ मठ, शिवाजीनगर, वागळे इस्टेट,ठाणे येथे आयोजित करण्यात आला असून सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू करावी , असे आवाहन श्री. स्वामीं समर्थ भक्त परिवार संस्था,शिवाजीनगर , वागळे इस्टेट,ठाणे..यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

103
10569 views

Comment