logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

विद्यार्थ्यांचा मृत्यू, पालकांना आर्थिक मदत


जळगाव
राज्य शासनाच्या रानीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शैक्षणिक वर्ष २०२४-२६ मध्ये जळगाव जिल्ह्यातील ५४ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (योजना) विभागाकडे सादर झाले होते. या सर्वच प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, १२. प्रकरणांत मदतीची रक्कम अर्जधारकांच्या बैंक खात्यात वर्ग झाली आहे, तर १४ प्रस्तावांसाठी रक्कम प्राप्त झाली असली तरी कागदपत्रांची पूर्तता बाकी असल्याने मदत वर्ग करता आलेली नाही. इतर प्रस्तावांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.

या योजनेत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व, सर्पदंश, आजारी पडून मृत्यू आदी कारणांसाठी ७५ हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते.

दाखल सर्व प्रस्ताव मंजूर

यंदा जळगाव जिल्ह्यातून ५४ अर्ज शिक्षण विभागाकडे दाखल झाले होते. या अर्जाची छाननी करून सर्वच पात्र प्रस्ताव मंजूर केले आहेत. यातील २६ प्रस्तावांसाठी निधी प्राप्त झाला आहे.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत अर्जदाराला निकषानुसार मदत केली जाते. त्यासाठी अर्जासह कागदपत्रांची पूर्तता करावी. शासनाकडून आलेला निथी वर्ग केला आहे. उर्वरित निधीसाठी मागणी केली आहे.

कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

23
835 views

Comment