logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिक्षणाधिकारी मनीष पवार यांचे धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने स्वागत. विविध विषयांवर चर्चा*.


धुळे : शिक्षणाधिकारी मनीष पवार यांचे शिक्षक संघाकडून स्वागत, विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

धुळे, दि. 17 मार्च 2026 — धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदावर मनीष पवार (शिक्षणाधिकारी माध्यमिक) यांची नियुक्ती झाल्याबद्दल धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत बदल करण्याबाबत शिक्षक संघाने मागणी मांडली. शाळेची वेळ सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ठेवण्यात यावी, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली. या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच शाळेची वेळ कमी करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिले.

तसेच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्याबाबत देखील संघटनेने मागणी केली. जिल्ह्यात ज्या शिक्षकांची २४ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे, त्या सर्वांना सरसकट निवड श्रेणी लागू करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन शिक्षणाधिकारी पवार यांनी दिले.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय पोतदार, जिल्हा नेते मनोहर आबा शिंदे, जिल्हाध्यक्ष गमन पाटील, जिल्हा सरचिटणीस शरद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, विजय देवरे, विजय पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रविंद्र पाटील, राकेश पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आधार बोरसे, धुळे तालुका अध्यक्ष मिलिंद चौधरी, तालुका उपाध्यक्ष किरण पाटील, कार्याध्यक्ष जितेंद्र कापडीस, शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज निकम, प्रहार संघटनेचे तालुका सरचिटणीस जयेंद्र सूर्यवंशी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यशवंत शिंदे

51
2736 views

Comment