'अभय शास्ती'स हवी मुदतवाढ
जळगाव : महापालिकेने लागू केलेली अभय शास्ती योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. मालमत्ता कराच्या थकीत रकमेवरील दंड माफ झाल्याने महसुलात मोठी वाढ झाली आहे. ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्यास महसुलात आणखी वाढ होऊ शकते असे घुगे यांनी निवेदनात म्हटले आहे. मनापाची नागरिकांकडे करांची मोठी थकबाकी आहे. ही वसुलीसाठी मुदतवाढ गरजेची आहे.