परत केरोशीन ( रॉकेल ) ची रांग?
AIMA news
इराणवर इस्रायल आणि अमेरिका या दोन देशांनी क्षेपणास्त्र डागली आणि त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना ठार केलं. त्यानंतर इराण विरुद्द इस्रायल आणि अमेरिका असा युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धाचा आजचा १७ वा दिवस आहे. ज्यामुळे जगातल्या अनेक देशांमध्ये इंधन टंचाई भासते आहे.
देशभरात गॅस
सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अडचण होऊ नये म्हणून राज्य सरकारनं रेशनिंगवरून पुन्हा रॉकेल देण्याची घोषणा केली आहे. राज्यात रॉकेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून जुन्या पद्धतीने रेशन दुकानांमधून त्याचं वितरण करण्याची योजना असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.