logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कुख्यात गुंड सागर मोहळकरचा उपचारादरम्यान मृत्यू

जामखेड (प्रतिनिधी):
जामखेड शहरात झालेल्या खळबळजनक गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेला कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा अखेर मृत्यू झाला आहे. गेल्या १२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या मोहळकरची प्राणज्योत खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मालवली.
काही दिवसांपूर्वी जामखेडमध्ये वर्चस्वाच्या वादातून सागर मोहळकरवर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर त्याला तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गोळी वर्मी लागल्याने त्याची प्रकृती खालावत गेली आणि आज त्याची मृत्यूशी झुंज संपली.
सागर मोहळकरच्या मृत्यूमुळे जामखेड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या गोळीबार प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी यापूर्वीच पथके रवाना केली असून, आता मोहळकरच्या मृत्यूनंतर या गुन्ह्याला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

53
1261 views

Comment