logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लेणी बघणे आणि लेणी समजून घेणे यांत खूप मोठा फरक आहे — चला लेणी अभ्यासू या..!MBCPR TEAM सोबत ऐतिहासिक वारशाची ओळख

बुध्द लेण्या हा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा जपण्यासाठी मेहनत घेतलीच पाहिजे. अन्यथा काळ कठीण असणार आहे. सरकारी यंत्रणा आहे पण असून काही एक फायदा नाही. अनेकदा पाठपुरावा करून केराची टोपली दाखवली जाते. लेणी बघणं आणी लेणी समजून घेणं यांत खूप मोठा फरक आहे, लेणी स्थानिक इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व वारसा जतन,स्वच्छता आणी लेणीच सौंदर्य जपण्यासाठी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी MBCPR TEAM एकनिष्ठ निस्वार्थ पणे प्रत्येक महिन्यात कार्यशाळेचे आयोजन करते तर्फे अनेक वेगवेगळे उपक्रम राभवते या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ लेणी बघण्यापुरता मर्यादित न राहता त्यामागील इतिहास, स्थापत्यकला, धर्मपरंपरा आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेणे हा आहे.

“लेणी बघणे आणि लेणी समजून घेणे यांत खूप मोठा फरक आहे,” या विचारातून या उपक्रमाची संकल्पना पुढे आली आहे. अनेक वेळा पर्यटक लेणी पाहतात, फोटो काढतात आणि पुढे जातात; मात्र त्या लेण्यांच्या भिंतींमध्ये कोरलेला इतिहास, शिल्पकला, प्राचीन जीवनपद्धती आणि त्या काळातील सामाजिक-धार्मिक परिस्थिती समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

MBCPR TEAM च्या कार्यशाळेचा उद्देश,बुद्धकालीन वारसा, इतिहास, लेणी संस्कृती यांचा सखोल तसेच प्रत्यक्ष स्थळ अभ्यास उपक्रम व अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहभागीांना लेण्यांची रचना, शिल्पांची वैशिष्ट्ये, शिलालेख, तसेच बौद्ध, जैन आणि हिंदू परंपरांशी संबंधित ऐतिहासिक माहिती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाते या उपक्रमामुळे तरुणांमध्ये इतिहासाबद्दलची आवड वाढेल आणि आपल्या वारशाचे संवर्धन करण्याची जाणीव निर्माण होईल, असा विश्वास आयोजक व्यक्त करतात

या उपक्रमात विद्यार्थी, इतिहास प्रेमी,लेणी अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात दिनांक २२/०३/२०२६ रोजी MBCPR समूह आयोजित ६१ वी अभ्यास कार्यशाळेचे आयोजन केले असून महाड परिसर वारसा अभ्यास यात्रा, गांधारपाले लेणी,कोल बुद्ध लेणी, चवदार तळे,अशा इतिहासीक स्थळाना अभ्यासणार आहेत यां कार्यशाळेचा उद्देश महाड परिसरातील बुद्ध लेणींचा ऐतिहासिक अभ्यास, बुद्ध लेणी कोरण्याचा इतिहास, स्थापत्यकला व शिल्पकला विश्लेषण,शिलालेखांची लिपी व भाषा मार्गदर्शन आणि वाचन आपणास सर्वाना विनंती आहे कि यां कार्यशाळेंसाठी बहूसंख्येने उपस्तित राहावे असे आव्हान MBCPR TEEM ने केले आहे

“चला लेणी अभ्यासू या” या मोहिमेमुळे आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची नव्या पिढीला ओळख होऊन त्याच्या जतनासाठी सकारात्मक पाऊल उचलले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कार्यशाळेंविषयी अधिक माहितीसाठी, -निकेतन सावंत :- 9819954911 (मुंबई विभाग ) मधुकर घोडेराव :- 9922982280 (पुणे विभाग ) राकेश गायकवाड :- 9765048867 (कोकण विभाग ) यांच्याशी संपर्क करा

27
981 views

Comment