logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

देऊळवाडी येथे श्री समर्थ धोंडू तात्या महाराज पुण्यतिथीनिमित्त शिवपुराण सप्ताहास प्रारंभ

देऊळवाडी येथे श्री समर्थ धोंडू तात्या महाराज यांच्या ९४ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज शिवपुराण कथेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गावातील भाविक, वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजा, आरती व हरिनामाच्या गजरात करण्यात आली. त्यानंतर शिवपुराण कथेला प्रारंभ झाला. उपस्थित भाविकांनी भक्तीभावाने कथा श्रवण करत वातावरण भक्तिमय केले.

या सप्ताहाच्या निमित्ताने दररोज हरिनाम, कीर्तन, प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील युवक मंडळ, वारकरी संप्रदायातील कार्यकर्ते व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. सप्ताहाच्या निमित्ताने देऊळवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

88
5952 views

Comment