शिक्षण अधिकाऱ्यांच्या आडमुठपणामुळे शिक्षकांची पेन्शन रखडली; सेवानिवृत्त शिक्षक आर्थिक संकटात – सूर्यकांत जोगदंड
शिक्षण अधिकाऱ्यांच्या आडमुठपणामुळे शिक्षकांची पेन्शन रखडली; सेवानिवृत्त शिक्षक आर्थिक संकटात – सूर्यकांत जोगदंड
बीड (प्रतिनिधी)
शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन दर महिन्याच्या एक तारखेलाच वितरित करणे बंधनकारक असताना, बीड जिल्ह्यात मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि आडमुठ्या कारभारामुळे अनेक शिक्षकांना अद्याप पेन्शन मिळालेली नाही. परिणामी जिल्ह्यातील वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षक आर्थिक संकटात सापडले असून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेन्शनचे बजेट १८ फेब्रुवारी रोजी उपलब्ध झाले होते, मात्र प्रभारी शिक्षणाधिकारी श्रीमती कुवर यांच्या टेबलवर पेन्शनची फाईल तब्बल आठ दिवस पडून राहिली. या काळात संबंधित फाईलवर स्वाक्षरी करण्यात आली नसल्याने शिक्षकांची पेन्शन प्रक्रिया ठप्प झाली. याबाबत शिक्षकांनी विचारणा केली असता त्यांच्याशी अरेरावी केल्याचाही आरोप पुढे येत आहे.
या प्रकरणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे तक्रार करण्यात आली असली, तरी अद्याप संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही किंवा त्यांचा पदभार काढण्यात आलेला नाही, अशी नाराजी शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, १६ मार्च उलटून गेला तरीही शिक्षकांची पेन्शन वितरित झालेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. एकीकडे शिक्षणाधिकारी विविध दौरे करत असताना दुसरीकडे सेवानिवृत्त शिक्षक मात्र आर्थिक विवंचनेत दिवस काढत आहेत.
पेन्शन न मिळाल्यामुळे अनेक वयोवृद्ध शिक्षकांना औषधोपचार, बँकेचे हप्ते, घरगुती खर्च तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करण्याची कसरत करावी लागत आहे. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने ईदचा खर्चही वाढलेला असून त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत कास्ट्राईब संघटना व इतर कर्मचारी संघटनांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन तातडीने वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा सर्व सेवानिवृत्त कर्मचारी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015