logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

विद्यार्थीनी श्रमदानातून महाविद्यालयात फुलवली परसबाग ! विविध भाजीपाल्याची लागवड शालेय पोषण आहारात वापर अन् विक्री

विद्यार्थीनी श्रमदानातून महाविद्यालयात फुलवली परसबाग !
विविध भाजीपाल्याची लागवड शालेय पोषण आहारात वापर अन् विक्री

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : भावी विद्यार्थ्यांना मातीची ओळख व्हावी आणि विषमुक्त अन्न तयार व्हावे या उद्देशाने भंडारा येथील सहकार नगरातील महिला अध्यापक महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. वर्षा चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक आणि विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या मोकळ्या जागेत श्रमदानातून परसबाग निर्माण करून ती फुलवली आहे.
हा उपक्रम महिला अध्यापक महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. वर्षा चांदेकर यांच्या संकल्पनेतून आणि अध्यापक विद्यालयाचे प्राध्यापक विनोद चव्हाण, प्रा. गणेश किरसान यांच्या मदतीने विद्यार्थिनींनी राबविला आहे. परसबागेत विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली आहे. त्यामुळे महाविद्यालयातील परसबाग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रमशक्तीचे महत्त्व समजावे, भावी शिक्षिकांच्या हातातून अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य करणार आहेत. म्हणून विद्यार्थ्यांच्या बालवयातच रुजविण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील ज्ञान हे आयुष्यभराची शिदोरी ठरते. यासाठी विद्यालयात परसबाग निर्माण करण्याचे कार्य करून महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अशी परसबाग फुलविली आहे.
महाविद्यालयाच्या परिसरात आंबा, मुंगना, कडिपत्ता, लिंबू, तुळशी, तुळी, परसबागेत वांगी, टोमॅटो, पालक भाजी, चवळी भाजी, लाल भाजी, मेथी, कोथिंबीर यासारख्या विविध भाज्यांची लागवड करून एक छोटेखानी, प्रशंसनीय तसेच आकर्षक, हिरवीगार, सेंद्रिय खतयुक्त आणि पर्यावरणपूरक परसबाग फुलवली आहे. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परसबागेची आकर्षकता वाढविली आहे. विद्यार्थिनींच्या गुणवत्ता वाढीसाठी प्राध्यापकांच्या सहकार्याने महिला अध्यापक महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जात असल्याचे महिला अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा चांदेकर यांनी सांगितले आहे.

*विद्यार्थिनींच्या गुणवत्ता वाढीसाठी सदैव प्रयत्न*

परसबाग निर्माण करण्याचा उद्देश केवळ भाज्या पिकविण्यापुरता मर्यादित नसून अध्यापक विद्यार्थिनींना शेतीचे योग्य नियोजन आणि आधुनिक पद्धती शिकविणे हा आहे. नवनिर्माण विद्यार्थिनींना पुढे शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या बालवयातच रुजविण्यात आलेले विविध क्षेत्रातील ज्ञान हे आयुष्यभराची शिदोरी ठरेल. केवळ पुस्तकी ज्ञानात विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्याबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान आत्मसात करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या उपक्रमासाठी मनोज टेकाम, सरिता लोंदासे, स्नेहा शेन्डे, किरण घोनमोडे, प्रांजली मारवाडे, साक्षी भलावे, शुभांगी येनुरकर, राखी रंगारी, वेदांती रामटेके, मयुरी नागोसे, चैतन्या तितीरमारे, माईसा केवट, आराधना मेश्राम, साक्षी राखडे, सानिया मारवाडे, श्रृती शेंडे, वैष्णवी राखे, सिमा पवनकर, शेजल भुरे, सानिका इंदूरकर, पल्लवी गभणे, पायल येंचिलवार, जान्हवी कठाने, सृष्टी मोटघरे, स्नेहा शेंडे, आकांक्षा भूरे, रुषाली राघोर्ते, काजल बुजाडे, कल्याणी नेरकर, हर्षाली केवट, दिप्ती भोयर, मयुरी येळणे इत्यादी महिला अध्यापक विद्यालयातील विद्यार्थिनींनी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य करतात.
*छात्रअध्यापक विद्यार्थिनींनी गिरविले बागायती शेतीचे धडे*
परसबाग निर्मिती उपक्रम राबवितांना विद्यार्थिनींना पाण्याचा योग्य वापर, नियोजन आणि पोषक अन्न पिकविण्याच्या विविध पद्धती तसेच बागायत शेतीचे धडे देऊन विद्यालयाच्या परसबागेत पिकविल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचा वापर आजच्या दैनंदिन आहारात व्हावा म्हणून जागृत नागरिक विक्री करत असतात. ज्यामुळे विद्यार्थिनींना चांगला, सकस, ताजा आणि विषमुक्त आहार मिळण्यास मदत होत असते हे विशेष

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
111 views

Comment