सापडलेले 1700/व मोबाईल प्रामाणिकपणे केले परत शिरसोली येथील चंद्रकांत बारी यांचा आदर्श
सापडलेले 1700/व मोबाईल प्रामाणिकपणे केले परत शिरसोली येथील चंद्रकांत बारी यांचा आदर्श
रामानंदनगर येथील रहिवाशी सौ.वैष्णवी पाटील हया सिटीमध्ये काही कामानिमित्त आल्याअसता त्यांची पर्स व मोबाईल कृष्णा भरीत सेंटर जवळ बॅगमध्ये टाकतांना खाली पडला, आणि त्या तेथून निघून गेल्या, तेथून रस्त्याने जात असणारे श्री. चंद्रकांत बारी रा. शिरसोली यांना ती पर्स व मोबाईल सापडला, बारी हे प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी तिथं 20 मी थांबून वाट बघितली, की कोणी येईल, तर त्यांना आपण हे सर्व परत करू, परंतु कोणी आले नाही म्हणून चंद्रकांत बारी हे जळगांव येथील त्यांच्या घरी गेले, मोबाईलवर कोणी फोन करेल याची वाट बघत होते, तेव्हा अर्ध्या तासाने सदर मोबाईल वर कॉल आला,व सर्व शाहानिशा झाली, आणि सर्व वस्तू बारी यांनी त्यांना स्वतः बोलावून प्रामाणिपणे परत केल्या, व सर्व वस्तु आणि पैसे परत मिळाल्यामुळं पाटील मॅडम यांनी आनंद वेक्त करत बारी यांचे आभार मानले