प्रेमसंबंधातून महिलेस धमकी, दाम्पत्याकडून तरुणाचा खून
वरखेडी : प्रेमसंबंधातून महिलेचे
अश्लील फोटो काढून धमकी देणाऱ्या तरुणाचा महिला व तिच्या पतीने खून करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. याप्रकरणी पती-पत्नीस अटक करण्यात आली आहे. दोघांनी खुनाची कबुली दिली आहे. ही घटना वरसाडे तांडा (ता. पाचोरा) येथे घडली.
विजय भीमा राठोड (२५, रा. वरसाडे तांडा नं. ३, ता. पाचोरा) अशी खून झालेल्या तरुणाचे तर संजय परशुराम जाधव व सोनाली संजय जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी पती-पत्नीची नावे आहेत.
वरसाडे तांडा येथील संजय ३३) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचा भाऊ विजय हा २५ फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेला होता. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिसात २६ फेब्रुवारी रोजी मिसिंगची नोंद करण्यात आली होती. यात त्याने भावाच्या घातपाताचा संशय व्यक्त केला होता.