logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ठाण्यात जात प्रमाणपत्रासाठी अडीच लाखांची लाच, उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याला अटक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीची फाईल प्रकरण..

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीची फाईल क्लिअर करून देण्यासाठी ही लाच घेतल्याची बाब पोलीस कारवाईतून समोर आली आहे.ठाण्यात जात प्रमाणपत्रासाठी अडीच लाखांची लाच, उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याला अटक

ठाणे: कोकण विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याला अडीच लाख रुपयांची लाच रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीची फाईल क्लिअर करून देण्यासाठी ही लाच घेतल्याची बाब पोलीस कारवाईतून समोर आली आहे.

कोकण विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे ठाण्यातील चरई येथील एमटीएनएल इमारतीत कार्यालयात आहे. या कार्यालयात मिनाक्षी नारायण उन्हाळे (४६) या उपसंचालक (संशोधन), वर्ग-१ या पदावर कार्यरत आहेत. त्यांना अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांनी पत्नी आणि मुलीचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्रसाठी अर्ज केला होता. या अर्जाची पडताळणीची फाईल मंजूर करून देण्यासाठी उन्हाळे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने १२ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड-अलिबाग कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही तक्रार वर्ग होताच, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली, त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.यानंतर १३ मार्च रोजी पथकाने चरई येथील कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून २ लाख ५० हजार रुपयांची लाच आपल्या केबिनमध्ये स्वीकारताना मिनाक्षी उन्हाळे यांना पंचासमक्ष सायंकाळी ४.१० वाजता रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

दरम्यान, भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही माहिती अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य : लोकसत्ता

0
503 views

Comment