logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मुकुंदनगरमध्ये अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; तिघांना अटक, मुख्य संशयित फरार

अहिल्यानगर:
शहरातील मुकुंदनगर परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले असून, सुमारे ३,३३,४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदनगर येथील हुसेनमियाँ मस्जिद जवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. सोफीयान कुरेशी नावाचा इसम आपल्या साथीदारांसह या ठिकाणी अवैध कत्तलखाना चालवत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.
तिघांना अटक, दोन जण फरार
पोलिसांनी घटनास्थळावरून खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे:
१. अस्तफाक अल्लाउद्दीन कुरेशी (वय ३८, रा. घासगल्ली कोठला, अहिल्यानगर)
२. मुदस्सर कदीर कुरेशी (वय ४०, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर)
३. शकील बाबासाब कुरेशी (वय ४०, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर)
तथापि, कत्तलखाना चालवणारा मुख्य आरोपी सोफीयान वहाब कुरेशी (रा. झेंडीगेट) आणि कत्तलखान्यासाठी जागा भाड्याने देणारा मालक वसीम तवेरा (रा. मुकुंदनगर) हे दोघेही पोलिसांना चकवा देऊन फरार झाले आहेत.
पोलीस कारवाई
या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

1
13 views

Comment