आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब!
शुभेच्छा बातमी
आदिवासी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन आदिम गुलाब गांगुर्डे यांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना त्यांनी अभ्यासाची जिद्द कायम ठेवून ही महत्त्वाची परीक्षा पास केली. त्यामुळे आदिवासी समाजातील युवक-युवतींना शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी शिक्षक, तसेच समाजातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भविष्यातही त्यांनी शिक्षण व समाजकार्यात अशीच प्रगती करावी, अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आदिम गुलाब गांगुर्डे यांना मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 🎉👏
Yashwant Shinde
DHULE MAHARASHTRA