महिला दिनाचे औचित्य साधून प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे कार्यक्रमाचे आयोजन.
दिनांक 13 मार्च 2026 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे महाराष्ट्र आम्ही एकत्र संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोटर ट्रैनिंग स्कूल च्या महिला प्रशिक्षकांचे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला वर्गाचे सत्कार करण्यासाठी मुख्य अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेचे महापौर श्री नितीन पाटील साहेब, प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलचे अधिकारी श्री जयवंत चव्हाण साहेब, तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री निलेश धोटे साहेब त्याचप्रमाणे नव निर्वाचित खारघर विभागीय नगरसेवक आणि नगरसेविका तसेच वाहन प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष श्री प्रभुदास भोईर (आण्णा )या सर्वांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.