मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाढीचा लाभ यंदापासूनच
मुंबई : गेल्या १९ वर्षांपासून प्रलंबित
असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून तो लागू केला जाईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. या निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून गळतीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. अरुण लाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत शिष्यवृत्तीच्या रकमेतील वाढीची मागणी केली. त्याला उत्तर देताना मंत्री शिरसाट म्हणाले, २००७ नंतर महागाई वाढली असली तरी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आलेली नव्हती.