जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे शैक्षणिक सत्र 2026–27 करिता “गुढी पाडवा – प्रवेश
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे शैक्षणिक सत्र 2026–27 करिता “गुढी पाडवा – प्रवेश वाढवा” या उपक्रमांतर्गत भरती पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात येणार आहे.
शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व चॉकलेटचे वाटप करण्यात येणार असून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या हस्ते पालकांसह विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत करण्यात येणार आहे.
तसेच शाळा समिती सदस्य व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली भाषा, गणित व इंग्रजी विषयांवर आधारित विशेष शैक्षणिक कृती पालकांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकांना माहिती व जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम दि. 19 मार्च 2026, गुरुवार रोजी सकाळी 8.00 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे आयोजित करण्यात आला असून पालकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा समिती व शिक्षकवृंदांनी केले आहे.