logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Aima midiya jan jan ki avaj दिनांक 14.3.2026 am 4:56 LPG Gas Crisis : सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे परवाने निलंबित करू; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Aima midiya jan jan ki avaj दिनांक 14.3.2026 am 4:56
LPG Gas Crisis : सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे परवाने निलंबित करू; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा
जिल्ह्यात सध्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत काही ठिकाणी तक्रारी येत असून काही एजन्सी किंवा विक्रेते सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा प्रकारांना अजिबात सहन केले जाणार नाही. सिलिंडरचा साठा करून जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि संबंधित एजन्सींचे परवाने तात्काळ निलंबित केले जातील, असा कडक इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत गॅस पुरवठा, वितरण व्यवस्था आणि ग्राहकांच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच गॅस वितरकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना वेळेवर आणि नियमानुसार गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत.
काही ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर, कृत्रिम टंचाई निर्माण करणे आणि जास्त दराने विक्री करण्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. अशा प्रकारांची चौकशी सुरू करण्यात आली असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच नागरिकांनीही अधिकृत दरापेक्षा जास्त पैसे मागितल्यास किंवा सिलिंडर देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित गॅस एजन्सीची तक्रार प्रशासनाकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

0
0 views

Comment