logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्र भूषण’ सन्मान पुरस्कार जाहीर अशोक काकडे, सत्यपाल महाराज, कचरू सारडा, शिवराज पाटील, सविता गिरे यांचा होणार सन्मान

महाराष्ट्र भूषण’ सन्मान पुरस्कार जाहीर

अशोक काकडे, सत्यपाल महाराज, कचरू सारडा, शिवराज पाटील, सविता गिरे यांचा होणार सन्मान

मुंबईत १५ मार्चला पत्रकारिता, आरोग्य आणि सामाजिक कार्याचा गौरव सोहळा; 'महाराष्ट्र भूषण सन्मान' आणि विविध उपक्रमांचा होणार शुभारंभ

'व्हॉईस ऑफ मीडिया', 'व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम' आणि महाराष्ट्र शासनाच्या 'आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती' चा उपक्रम.

मुंबई प्रतिनिधी
'व्हॉईस ऑफ मीडिया', 'व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम' आणि महाराष्ट्र शासनाच्या 'आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती' यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे 'महाराष्ट्र भूषण सन्मान कार्य २०२५' पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावणारे आणि इतिहास निर्माण करणारे अशोक काकडे-देशमुख (सांगली जिल्हाधिकारी), प्रबोधनकार, कीर्तनकार सत्यपाल महाराज, समाजसेवक सारडा कचरू हिरालाल, शिक्षणतज्ञ शिवराज पा. पवार, राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रा. डॉ. सविता गिरे पाटील यांना 'महाराष्ट्र भूषण सन्मान कार्य २०२५' जाहीर झाला आहे. या पाचही 'महाराष्ट्र भूषण’ मान्यवरांनी त्यांच्या कार्यात खूप मोठा इतिहास केला आहे.

अशोक काकडे-देशमुख यांनी शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षा, या कामात पुढाकार घेऊन राज्यात एक इतिहास केला आहे. संत सत्यपाल महाराज यांनी सलग ५० वर्ष सामाजिक प्रबोधनाचा निस्वार्थी वारसा चालवला आहे. सारडा कचरू हिरालाल यांनी शिक्षणाची कास धरत हजारो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शिवराज पा. पवार होटाळकर यांनी ग्रामीण शिक्षणाची कास धरून हजारो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहास आणले आहे. प्रा. डॉ. सविता गिरे पाटील यांनी राज्यातील १५ हजार पेक्षा जास्त मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणत त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. ह्या पाच ही जणांनी पत्रकार आणि पत्रकारितेसाठी अनेक वेळा महत्वपूर्ण पाऊल उचलेले आहेत.

येत्या १५ मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एका भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे भूषवणार असून, राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यात उल्लेखनीय कार्यासाठी अशोक काकडे-देशमुख (सांगली जिल्हाधिकारी), प्रबोधनकार सत्यपाल महाराज, सारडा कचरू हिरालाल, शिवराज पा. पवार आणि प्रा. डॉ. सविता गिरे पाटील यांना 'महाराष्ट्र भूषण सन्मान २०२५' प्रदान करण्यात येईल. तसेच, राज्यातील विविध विभागांतील पत्रकारांना त्यांच्या सकारात्मक पत्रकारितेसाठी 'पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड २०२५' देऊन गौरविण्यात येणार आहे, ज्यामध्ये कुणाल लाडे, संदेश साळुंके, शाहिद पठाण, रुपेश बाजड, राहुल पवार, स्वप्निल कांबळे, ईश्वर महाजन, महेंद्रसिंग गिरासे, भारत सवणे, विनोद कांबळे, यांसह उर्दू विंग लियाकत पठाण नाशिक,महिला विंग सारिका शिंदे ठाणे,

साप्ताहिक विंगचे संदीप पिंपळकर वाशिम, रेडिओ विंग महेश जगताप पुणे
डिजिटल विंग मल्हारी ओमासे सांगली, यांचा समावेश आहे.
केवळ पुरस्कार सोहळाच नव्हे, तर पत्रकारांच्या कल्याणासाठी अनेक ऐतिहासिक उपक्रमांचा शुभारंभ या दिवशी होणार आहे. यामध्ये व्हॉईस ऑफ मीडियाच्या साडेसहा हजार पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या सुमारे २५ हजार कुटुंबीयांना आयुष्यमान कार्डांचे वाटप करण्यात येणार असून, राज्यातील प्रत्येक शहरात ५ 'पत्रकार मित्र दवाखाने' सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण करार केला जाणार आहे. पत्रकारांच्या मानसिक आरोग्यासाठी श्रीश्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली देशव्यापी 'भारत पत्रकार ध्यान साधना' उपक्रमाची सुरुवातही या प्रसंगी होईल. साहित्य क्षेत्रातही या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व असून, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे लिखित 'जिंकलेले योद्धे' या पुस्तकाचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांत प्रकाशन करण्यात येईल. तसेच त्यांनीच लिहिलेले व अतुल दिवे यांनी गायलेले 'यंदा तरी पावसाने' हे गाणे आणि संघटनेच्या विशेष गीताचे प्रकाशनही यावेळी होणार आहे.

कार्यक्रमाला आयएएस अधिकारी महेंद्र कल्याणकर, अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, उद्योजक राणा सूर्यवंशी, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला आणि राज्यातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांचे संपादक प्रसन्ना जोशी, विशाल पाटील, विनोद तळेकर, प्रसाद काथे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या "सत्यवाणी" या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने सोहळ्याची सुरुवात होईल आणि त्यानंतर मुख्य सोहळा पार पडेल. या कार्यक्रमासाठी संघटनेचे आंतरराष्ट्रीय प्रमुख गगन महोत्रा, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के आणि सर्व विभागीय पदाधिकारी जय्यत तयारी करत असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

1
57 views

Comment