logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुण्यात ५३ किलो गांजासह एक जण अटकेत; फॉर्च्युनर कारसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यात ५३ किलो गांजासह एक जण अटकेत; फॉर्च्युनर कारसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी | रणजीत मस्के

पुणे : पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने कारवाई करत गांजाचा मोठा साठा विक्रीसाठी आणणाऱ्या एका इसमाला अटक केली. त्याच्याकडून सुमारे ५३ किलो १४ ग्रॅम गांजा, फॉर्च्युनर कार आणि मोबाईल असा एकूण ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम रविंद्र कुंजीर (वय ३२, रा. थेऊर, पुणे) हा गांजाचा साठा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी थेऊर परिसरात सापळा रचून बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले.

या कारवाईत आरोपीकडून १० लाख ६० हजार २८० रुपयांचा ५३ किलो १४ ग्रॅम गांजा, ३० लाख रुपयांची फॉर्च्युनर कार आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

#Pune Police #Crime Branch Pune #Drug Bust #Anti Narcotics Operation #pune

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
101 views

Comment