logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दीक्षाभूमी येथे समता सैनिक दलाचा ९९ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा...!


काटोल प्रतिनिधी :-
नागपूर, दि. १३ मार्च २०२६ — नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे समता सैनिक दलाचा ९९ वा स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.नागपूर,नागपूर ग्रामीण तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील समता सैनिक दलाचे पदाधिकारी, सैनिक व महिला सैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समता सैनिक दलाचे मुख्य संयोजक तथा वरिष्ठ अधिकारी मा. घनश्यामजी फुसे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ समन्वयक तथा वरिष्ठ अधिकारी मा. राजरतन कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मा. राजरतन बनसोड उपस्थित होते.
यावेळी नागपूर ग्रामीण समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष मा. विधेश्वर गजबे (बंडूभाऊ ), नागपूर ग्रामीण कमांडर मा. डॉ. सुनीलजी नारनवरे, सचिव मा. दीपकजी ढोके, मुख्य शाखा संघटक मा. भागवतजी पाटील, शाखा संघटक विकास सोमकुवर, पारडसिंगा सर्कलचे नीलकंठ गजभिये, काटोल अध्यक्ष लक्ष्मीबाई शेंडे, शाखाप्रमुख संध्या सहारे तसेच सचिव शीला गजभिये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच चिखली (मैना), मेंडकी, रोहना, चणकापूर, लिंगा, राउळगाव, खरसोली, सावळी खुर्द, रिधोरा, ढवळापूर, हातला, वाकी, रामगिरी, उमरेड तालुका आणि नरखेड तालुका या शाखांमधील पदाधिकारी व महिला सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांनी समता सैनिक दलाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेत संघटन अधिक मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले. समाजात समता, बंधुता आणि संघटनशक्ती वाढविण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर ग्रामीणचे कमांडर मा. डॉ. सुनीलजी नारनवरे, मेंडकी शाखेच्या पदाधिकारी कांता गजभिये तसेच वरिष्ठ अधिकारी स. सै. दल दादारावजी तागडे यांनी समता सैनिक दलाच्या कार्याची माहिती देत उपस्थित सैनिकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी “जास्तीत जास्त शाखा स्थापन करून ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक’ हा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार” सर्व सैनिकांनी व्यक्त केला. समाज संघटन बळकट करून समता, न्याय आणि बंधुता यांचे विचार गावागावात पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

29
1007 views

Comment