महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली २६ वर्षे आयोजित करण्यात येत असलेल्या मटा सन्मान पुरस्कार सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला.
📍 #मुंबई |
महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली २६ वर्षे आयोजित करण्यात येत असलेल्या मटा सन्मान पुरस्कार सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माझ्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम हेमलकसा परिसरात आयुष्य वाहून आदिवासी समाजाची सेवा करणाऱ्या डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.सौ.मंदा आमटे यांच्या कार्यामुळे हेमलकसा हे सामाजिक कार्याचे तीर्थक्षेत्र बनले आहे, मटा सन्मान सोहळ्यात या दांपत्याला ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले असून हा सन्मान देण्याचे भाग्य मला लाभले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
या दांपत्याने अतिशय कठीण परिस्थितीत जीवन घालवले असून संघर्षाच्या काळात ते कधी खचले नाहीत, यश मिळाल्यानंतरही ते कधीही बदलले नाहीत. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे यावेळी नमूद केले. काही काळापूर्वी ते आजारी असताना आपण त्यांना भेटायला गेलो होतो आणि महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे ते लवकर बरे होतील असा विश्वास त्यांना दिला होता अशी आठवण याप्रसंगी सांगितली.
यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या भारताच्या अंडर-१९ विश्वविजेता संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याचेही यावेळी अभिनंदन केले. तसेच वसुंधरा साथी सन्मान मिळालेल्या पर्यावरणतज्ज्ञ कृष्णमेघ कुंटे यांच्या कार्याचाही गौरव केला. फुलपाखरांवर केलेले त्यांचे संशोधन पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी संस्कृतिक मंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम, निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर, मराठी सिने, नाट्य, टिव्ही, ओटीटी क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
#महाराष्ट्र_टाईम्स #MaharashtraTimes #मटासन्मान #MataSanman #Mumbai #EknathShinde #Maharashtra
Maharashtra Times Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mahesh Manjrekar - महेश मांजरेकर
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015