logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महिलांनो सावधान... गॅस सिलिंडरच्या नावाखाली मोठा फ्रॉड, महिलांच्या खात्यातून ४ लाख काढले, कशी झाली फसवणूक?

कल्याण- डोंबिवली परिसरात ऑनलाइन फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले. महानगर गॅस लिमिटेडचे प्रतिनिधी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी दोन महिलांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख रुपये लुटले.
कल्याण- डोंबिवली परिसरात ऑनलाइन फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले. महानगर गॅस लिमिटेडचे प्रतिनिधी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी दोन महिलांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख रुपये लुटले. विशेष म्हणजे, गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फायदा घेत फसवणुकीचा हा नवा फंडा वापरला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण गॅस वितरण कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमची गॅसची माहिती अपडेट करायची आहे, अन्यथा गॅस पुरवठा खंडित होऊ शकतो, अशी भीती त्याने महिलांना घातली.
भामट्याने महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना व्हॉट्सॲप किंवा मेसेजद्वारे एक APK फाईल पाठवली. महिलांना ही फाईल डाऊनलोड करून त्यातील एक फॉर्म भरण्यास सांगण्यात आले. महिलांनी ही लिंक उघडून फॉर्म भरताच, सायबर चोरांना त्यांच्या फोनचा आणि बँक खात्याचा ताबा मिळाला. काही वेळातच दोन्ही महिलांच्या खात्यातून एकूण ४ लाख रुपये डेबिट झाल्याचे संदेश आले, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर सेलच्या मदतीने पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. सध्या नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगरात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे सक्रिय झाले आहेत.

कोणती काळजी घ्यावी?
- कोणाच्याही सांगण्यावरून फोनवर कोणतीही APK फाईल किंवा संशयास्पद ॲप डाऊनलोड करू नका. - गॅस संबंधित कोणतेही अपडेट करायचे असल्यास कंपनीच्या अधिकृत ॲप किंवा वेबसाइटचाच वापर करा. - बँक तपशील किंवा ओटीपी कधीही कोणालाही देऊ नका. - फसवणूक झाल्यास त्वरित '१९३०' या सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधा.
सौजन्य : लोकमत न्यूज

10
536 views

Comment