रिसोडमध्ये मोफत 'मेगा गुडघा व नितंब प्रत्यारोपण' शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन..
रिसोड (प्रतिनिधी):
वाढत्या वयातील सांधेदुखी आणि गुडघ्यांच्या त्रासामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन (मुंबई) आणि संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने, मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत रिसोड येथे 'मोफत मेगा गुडघा व नितंब (Joint) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया' पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तपासणी शिबिराचे वेळापत्रक आणि ठिकाण:
* रिसोड: २६ मार्च ते २९ मार्च २०२६ | वेळ: सकाळी १० ते ४ | ठिकाण: समता सर्वस्व आरोग्य सेवा केंद्र, शिवाजी चौक, रिसोड.
* बुलढाणा: २४ मार्च २०२६ | ठिकाण: जिल्हा स्त्री रुग्णालय, बुलढाणा.
* हिंगोली: २५ मार्च २०२६ | ठिकाण: चौधरी कॉम्प्लेक्स, चिरायू हॉस्पिटल समोर, अग्रसेन चौक, हिंगोली.
तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन:
या शिबिरात प्रसिद्ध गुडघा प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. नारायण खंडेलवाल रुग्णांना मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत. डॉ. खंडेलवाल यांनी आतापर्यंत २० हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. शिबिरादरम्यान रुग्णांची प्राथमिक तपासणी, एक्स-रे आणि आवश्यक वैद्यकीय सेवा मोफत पुरवल्या जातील.
मोफत शस्त्रक्रिया:
या तपासणी शिबिरात ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची प्रत्यक्ष गरज आहे, अशा रुग्णांची निवड केली जाईल. निवड झालेल्या पात्र रुग्णांवर मुंबई येथील संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या सुवर्णसंधीचा रिसोड, बुलढाणा आणि हिंगोली परिसरातील गरजू नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. मधुसूदनजी अग्रवालतसेच मा.श्री.उत्तमचंदजी बगडीया यांनी केले