logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नगरपरिषदेने दिशा कंपनीचा ठेका त्वरीत रद्द करावा- सुभाष त्रिभुवन

नगरपरिषदेने दिशा कंपनीचा ठेका त्वरीत रद्द करावा- सुभाष त्रिभुवन

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) श्रीरामपूर शहरात स्वच्छता राहावी या उद्देशाने श्रीरामपूर नगर परिषदेने दिशा एंटरप्राईजेस या कंपनीला दरमहा तब्बल ३६ लाख रुपयांचा घनकचऱ्याचा ठेका दिलेला आहे. मात्र ठेका देऊनही शहरातील स्वच्छतेची स्थिती समाधानकारक नसून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांनी केला आहे. दिशा इंटरप्राईजेसचे ठेकेदाराने नगर परिषदेच्या अटी-शर्तींचे पालन केले नसल्याने सदरील ठेका तात्काळ रद्द करावा अन्यथा रिपाईच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दिनांक १० मार्च रोजी ठेकेदारामार्फत काम करणारे काही आरोग्य कर्मचारी शहरात विषारी पावडर फवारणी करत असताना त्या पावडरचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला. काम करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, मळमळ होऊ लागली. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने साखर कामगार हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे श्रीरामपूर नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी संजय आरणे तसेच दिशा इंटरप्राईजेसचे ठेकेदार सुरज माळी यांना देखील त्या पावडर मुळे त्या ठिकाणी अस्वस्थ व मळमळ होऊ लागल्याने त्यांना देखील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले आहे.घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता ठेकेदार कंपनीकडून त्यांना आवश्यक असलेली चांगल्या दर्जाची सुरक्षा साधने दिली जात नसल्याचे समोर आले.आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करताना हॅन्ड ग्लोज, मास्क, बूट, फायबरची टोपी तसेच सुरक्षात्मक ड्रेस देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात त्यांना फक्त युज अँड थ्रो हॅन्ड ग्लोज व मास्क दिले जातात. ते देखील नियमितपणे न देता आठ ते पंधरा दिवसांतून एकदाच दिले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीविताशी खेळ केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छतेचा अभाव, गटारींची दुर्दशा आणि अस्वच्छता दिसून येत असल्याने श्रीरामपूरकरांच्या आरोग्याशी थट्टा केली जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.
दरमहा ३६ लाख रुपये खर्च करूनही जर दिशा एंटरप्राइजेस कंपनी नगर परिषदेच्या अटी-शर्तींचे पालन करत नसेल तर सदरील दिशा एंटरप्राईजेस कंपनीचा ठेका त्वरीत रद्द करून दुसऱ्या सक्षम ठेकेदाराला देण्यात यावा अशी मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल यांच्या नेतृत्वाखाली तसेच नगरसेवक संजय गांगड,माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे,संजय रूपटक्के,संतोष मोकळ,विशाल सुरडकर ,अक्षय काळे,सोनु बागुल यांच्या उपस्थितीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अन्यथा रिपाईच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
47 views

Comment