logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हिताकरिता उपोषणामध्ये संबंधित घटकांनी सहभागी व्हावे- नरेश ईश्वरकर ३ दिवसांपासून उपोषण सुरू

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हिताकरिता उपोषणामध्ये संबंधित घटकांनी सहभागी व्हावे- नरेश ईश्वरकर
३ दिवसांपासून उपोषण सुरू

विलास केजरकर भंडारा.

भंडारा :- जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ७६७ शिक्षक तसेच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी ही पदे मिळून जवळपास ८७६ पदे रिक्त असल्यामुळे जिल्हयातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी जिल्हयातील विद्यार्थ्यांचा पायाच कमजोर होत असून त्यांचा शैक्षणिक विकास खुंटलेला आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी इतर शाळांमधील विद्यार्थ्यांसोबतचे स्पर्धेमध्ये मागे पडत असल्याने त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना हया परिस्थितीतून बाहेर काढण्याकरिता वरिल रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावी याकरिता जिल्हा परिषद भंडाराचे शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर यांनी मागील वर्षभरापासून शासनाकडे पाठपुरावा करूनसुध्दा महाराष्ट्र शासनाने याबाबत काहीच सकारात्मक कार्यवाही न केल्यामुळे शिक्षण सभापती श्री नरेश ईश्वरकर हे जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, पंचायत समिती सभापती, सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालकवर्ग यांचेसह वरिल रिक्त पदे भरण्याच्या मागणीकरिता दिनांक १० मार्च २०२६ पासून जिल्हा परिषद भंडाराच्या मुख्यालयासमोर उपोषण सुरू आहे.
या उपोषणामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी संबंधित असलेल्या सर्व घटकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सुरु असलेल्या उपोषणास चळवळीचे स्वरुप देऊन जिल्हयातील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्याकरिता शासनास भाग पाडण्यास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती नरेश ईश्वरकर यांनी केले आहे.
सोबतच या पत्रकातून शासन, प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन पदभरती कार्यवाही सुरु न केल्यास संबंधित घटक व विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारासुध्दा देण्यात आला आहे.
या आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष कविता ऊईके, महिला व बालकल्याण सभापती अनिता नलगोपुलवार, आरोग्य सभापती
आनंदजी मलेवार, रमेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे, विनोद बान्ते, यशवंत सोनकुसरे, महादेव पचघरे, गजानन झंझाळ, मोहन पंचभाई, निलकंठ कायते, महादेव बुरडे, महेंद्र चव्हाण, देवाजी पचघरे, रितेश वासनिक, डॉ. कृष्णकुमार शुक्ला, रमेश पारधी, बाणाभाऊ सव्वालाखे, महादेव बुरडे, छोटू मिरासे, सह जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, पंचायत समिती सभापती, सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालकवर्ग सहभागी झालेले आहेत.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
172 views

Comment