logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

"याला हाकला... नाहीतर हा आपला देश उद्ध्वस्त करून टाकेल. हा कधीच सत्ता सोडणार नाही.

"याला हाकला... नाहीतर हा आपला देश उद्ध्वस्त करून टाकेल. हा कधीच सत्ता सोडणार नाही. आपण सगळ्यांनी एक होऊन त्याला पायऊतार व्हायला लावलं पाहीजे. जोपर्यन्त याच्या हातात हा देश आहे तोपर्यन्त आपल्या देशाच्या ऐतिहासिक मुल्यांना धोका आहे."

...हे बोलताना त्याचा गळा दाटून आला. साधासुधा कलावंत नाही तो. जगातल्या सर्वोत्तम अभिनेत्यांमधला एक आहे. पडद्यावर अनेक अविस्मरणीय भुमिकांमध्ये जीव ओतणारा तो तगडा सुपरस्टार देशाच्या भविष्याच्या काळजीनं हतबल होऊन डोळ्यांतलं पाणी लपवताना दिसला आणि बघणारा प्रत्येकजण भावूक झाला.

…तो अभिनेता आहे 'रॉबर्ट दी निरो' !
मागच्या आठवड्यात एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यानं डोनाल्ड ट्रम्पच्या देशविघातक धोरणांवर थेट आणि परखड शब्दांत टीका केली. या ट्रम्पला हुसकावून लावला नाही तर हा देश तो विकून टाकेल ही भिती त्यानं व्यक्त केली.

अमेरिकेच्या नागरिकांना तो म्हणाला, "ट्रम्प या देशाचा शत्रू आहे. कधी ना कधी त्याची सत्ता जाईल या भ्रमात राहू नका. स्वत:ला फसवू नका. तो सत्ता सोडणार नाही. तो आपल्यात फूट पाडतोय. पण त्याला बळी न पडता आपण सगळ्यांनी एक होऊया…त्याला जायला भाग पाडुया."

अर्थात तिकडेही ट्रम्पची अंधभक्तपिलावळ आहे. त्या पिलावळीनं रॉबर्ट दी निरोला प्रचंड ट्रोल केलं. त्याच्या रडण्यावरून त्याला 'बायल्या' वगैरे म्हणाले... पण वाघानं भिक नाही घातली. पुन्हा ट्रम्पला सणसणीत शिवी हासडून अंधभक्तांच्या बुडाला आग लावली. बाकीचा डोकं ठिकाणावर असलेला अख्खा देश रॉबर्ट दी निरोच्या पाठीशी भक्कम उभा आहे.

एका कलावंताला असलेली भवतालाची जाण... देशाबद्दलची तळमळ... लोकशाहीविषयी असलेली आस्था...आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ताधीशाला थेट जाब विचारण्याची हिंमत... सगळंच काळजात रुतून बसलं !

खरा 'हिरो' असा असतो भावा.
अर्थात, रॉबर्ट दी निरोनं मुलाखतीत जे मांडलंय त्यावर आपण सगळ्यांनीच नीट विचार करण्याची गरज आहे.

- किरण माने.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment