logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अहमदपूर पंचायत समिती चे सभापती सुरजभैय्या बाबासाहेब पाटील यांनी पदभार स्विकारताच अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेतली . सर्वसामान्य जनतेसाठी सभापती पद .

सर्व सामाण्य जनतेला न्याय देण्यासाठी सभापती पदाचा वापर करणार .
सभापती सुरजभैय्या बाबासाहेब पाटील .

(मागील काळातील प्रकार यापुढे चालणार नाहीत असा सज्जड दम दिला)
बालाजी पडोळे
शिरुर ताजबंद (जि लातूर ) मी आज पंचायत समिती सभापती असलो तरी फार कांही वेगळा नसुन मी सर्वसामाण्य जनतेतून निवडुन आल्याने सर्वमाण्यांच्या कल्याणासाठी सभापती म्हणुन काम करणार असल्याचे शिरुर ताजबंद येथे बोलताना नुतन सभापती सुरजभैय्या बाबा साहेब पाटील यांनी सांगीतले.
पाटील यांनी सांगीतले दि.११मार्च रोजी सर्व अधिकारी ,कर्मचारी यांची ओळख सभा घेतली असुन सर्व कर्मचार्‍यांनी आॅफीसला वेळेवर उपस्थित राहावे.जनतेच्या कामाची अडवणुक व्हायला नको,जाणुन बुजून एखाद्या कर्मचारी सर्वसामाण्यांच्या किमाची अडवणुक करत असेल त्याची गय करणार नाही.
मागील वर्षात पंचायत समितीत कामे विशेषत हा शेतकर्‍यांच्या इंधन विहीर,गोठा,घरकुल ची बील काढण्यासाठी अडवणुक केली जात होती ते आता चालणार नाही , शेतकर्‍यांकडुन कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता ग्रामरोजगारने पण वेळैत मस्टर दाखल केले पाहीजेत.वेळैत बीले मिळाली तर शेतकरी वेळेत काम करुन सुखी होतील.
पंचायत समितीत कोणता अधिकारी वा कर्मचारी कामाची अडवणुक करत असेल तर थेट माझ्याशी सपर्क साधावा त्याचे वेळैत काम करुन दिले जाणार अशी माहीती सभापती सुरजभैय्या बाबासाहेब पाटील यांनी शिरुर ताजबंद येथे प्रतिनीधीशी बोलताना सांगीतले.

12
661 views

Comment