logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पिंपळगाव (राऊत) येथे शेतकऱ्यांसाठी HDPS/CS व Biochar विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम....!

काटोल प्रतिनिधी :-
पिंपळगाव (राऊत), ता. नरखेड, जि. नागपूर (दि. 11 मार्च 2026) – CITI-CDRA आणि Agrigenic Farmers Producer Company यांच्या संयुक्त विद्यमाने Regenerative Cotton Standard अंतर्गत शेतकऱ्यांसाठी HDPS/CS व Biochar या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. युगांतर मेश्राम (प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, CITI-CDRA) यांनी केली. कार्यक्रमात कृषीतज्ञ श्री. दीपक देशमुख (नरखेड) यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. तसेच डॉ. आकाश धुंदे (CEO, Agrigenic F.P. Company Ltd.), श्री. मुंगभाते (मंडळ कृषी अधिकारी, भारसिंगी-नरखेड), श्री. बालपांडे (सहाय्यक कृषी अधिकारी), श्री. गोडबोले (RCS, Agrogenix) आणि सौ. खंडाते (कृषी सहाय्यक) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कपाशी व इतर पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जमिनीचे आरोग्य टिकविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात खालील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली –
HDPS/CS Cotton Plot
जमिनीचे प्रकार (Type of Soil)
उत्पादन वाढविण्याचे उपाय (Increasing Productivity)
SOC Maintain
Intercropping व Crop Rotation
Fertilizer Management
Pesticides Management
Biochar / Shredder वापर
Cotton Picking Management
Cotton Storing Management
कार्यक्रमाला उपसरपंच श्री. मोहन निंबाळकर आणि गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. प्रभाकर राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयूर गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. पंकज निंबाळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. महेंद्र सरदार, श्री. प्रदीप कळंभे, श्री. कोमल चौधरी, श्री. लीलाधरजी नाखले आणि श्री. सिद्धार्थ निकोसे यांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

223
17549 views

Comment