logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मनरेगा मजुरांची मजुरी प्रलंबित; प्रशासनाकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी...


अहिल्यानगर, दि. ११ : अहिल्यानगर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या अनेक मजुरांची मजुरी अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे संबंधित मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते तथा AIMA Media चे जिल्हा कार्यकारी सदस्य रविकुमार प्रदीप शिंदे यांनी दिनांक 09 मार्च 2026 रोजी संबंधित विभाग तसेच मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय मुंबई येथे लेखी तक्रार सादर केली होती. मुख्यमंत्री सचिवालयाकडून सदर प्रकरण संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान, FTO Tracking System वर तपासणी केली असता मजुरी संदर्भातील प्रस्ताव DDO Sign व PAO Sign स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मजुरांना वेळेत मजुरी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री कार्यालय, ग्रामविकास विभाग, मनरेगा आयुक्त कार्यालय तसेच जिल्हा प्रशासन यांनी सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन प्रलंबित मजुरी लवकरात लवकर मजुरांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
— रविकुमार प्रदीप शिंदे
जिल्हा कार्यकारी सदस्य व प्रतिनिधी, AIMA Media
अहिल्यानगर
#MGNREGA #मनरेगा #Ahilyanagar #MaharashtraNews #LabourNews #AIMAMedia #BreakingNews #RuralDevelopment #NewsUpdate

20
1590 views

Comment