ब्रेकिंग युद्धाचा पाकिस्तानवर परिणाम.
Aima news
मध्य पूर्वेतील आखाती देशांमधील युद्ध आणि स्ट्रेट होर्मुझमधील वाढत्या तणावामुळे आता शेजारील राष्ट्र पाकिस्तानात जीवन जगणेही कठीण झाले आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किंमतीने १०० डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे पाकिस्तानात इंधन सकट आणखी तीव्र झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तान सरकारने अनेक कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इंधनाची मागणी कमी करण्यासाठी आणि ऊर्जा संकटाला सामोरे जाण्यासाठी शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यामागे देशातील पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचा हेतू आहे. सरकारी निर्णयानुसार, पाकिस्तानात शाळा २ आठवडे बंद राहतील. कॉलेज, युनिवर्सिटीचे क्लास ऑनलाईन घेतले जातील. ज्यामुळे विद्यार्थी आणि शालेय कर्मचाऱ्यांचा प्रवास कमी होईल. त्याशिवाय ऑफिशियल डिनर, इफ्तार पार्टी यांच्यावरही बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे इथपर्यंत परिस्थिती येऊन पोहचली आहे.